मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला राज ठाकरेंचा प्रतिसाद

- आठशे जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पुढे ढकलला

raj-thackeray-sharmila-thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांनी केलेल्या आवाहनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांच्या उपस्थितीत आयोजित आठशे जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आठशे जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. येत्या शुक्रवारी म्हणजेच 26 फेब्रुवारीला राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. ठाणे पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या तयारीसाठी दररोज शंभर मनसे कार्यकर्ते रात्रंदिवस नियोजन करत होते. आठशे जोडप्यांना साडी, भांडी, बाशिंग यांचं वाटपही करण्यात आलं होतं. फक्त 26 फेब्रुवारीला जोडप्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार टाकणे, एवढा विधी होणे बाकी होते.

अडीशे बाय अडीशे फुटाचा मंडप आणि भव्य स्टेज तयार करण्यासाठी विक्रमगड तालुक्यात साठ मंडप कामगार काम करत होते. संपूर्ण तयारी दृष्टीक्षेपात आली असताना काल दुपारी राज ठाकरे यांचा हा सोहळा पुढे ढकलण्याचा आदेश आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER