किल्ल्याचा बुरुज, उगवता सूर्य आणि उंच भरारी घेणारा पक्षी ; राज ठाकरेंचे ट्वीट

Raj Thackeray

मुंबई :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) आज (9 मार्च) 15 वा वर्धापन दिन (15th-anniversary-party) आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून वर्धापन दिनाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. नुकतंच मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ट्वीट करत या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा, असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.

राज ठाकरेंनी या ट्वीट केलेल्या फोटोत किल्ल्याचा बुरुज पाहायला मिळत आहे. त्याला फुलांच्या रंगेबेरंगी माळांनी सजवण्यात आले आहे. तसेच नुकताच होणारा सूर्यादय आणि आकाशात उंच भरारी घेणारा एक पक्षी दिसत आहे. या फोटोवर 15 वा वर्धापन दिन, तमाम महाराष्ट्र सैनिकांना मन:पूर्वक शुभेच्छा असे लिहिण्यात आले आहेत.
इतकेच नाही तर विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी काही हॅशटॅगही वापरले आहेत. #मनसेवर्धापनदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रप्रथम #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक असे टॅग वापरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER