
मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याच पार्श्वभूमीवर यावर संभाव्य उपाय म्हणून लॉकडाऊनला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही (MNS) विरोध केला आहे. या संदर्भात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ‘न्यूज-१८ लोकमत’ला आपली प्रतिक्रिया दिली आहे. “लॉकडाऊन केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होते, असे शास्त्रीसदृष्ट्या सिद्ध झालेले नाही, तसे काही असेल तर आरोग्यमंत्री गेल्या वर्षी लॉकडाऊन करण्यात आलं. त्या वेळेस राज्य सरकार आणि सर्वसामान्यांना या संदर्भात कोणतीच माहिती नव्हती. मात्र गेल्या वर्षभरात कोरोनावर कोणते वैद्यकीय उपचार करावे लागतात, त्याच्यासाठी लागणारी संसाधनं उपलब्ध आहेत, लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का?” असा सवालही देशपांडे यांनी विचारला आहे.
रात्री ८ वाजतानंतर हॉटेल्स आणि बार बंद करण्यात आले आहेत. हप्ते मिळत नसल्याने हे बंद करण्यात आले आहेत का?” असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रसारमाध्यमांनीही लोकांना बेजबाबदार म्हणून कोरोनाची भीती घालू नये, असा सल्लाही देशपांडे यांनी दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला