शेतकरी-यांसाठी मनसे रस्त्यावर

Raj Thackeray & farmer

मुंबई : राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनसे (MNS) समाजातील प्रत्येक घटकांच्या प्रश्नांना घेऊन कोणत्या ना कोणत्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. तर कधी निवेदनांच्या माध्यमातूनही मनसे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र सरकारला त्या प्रश्नांची जाणिव करून देत असते.

आता मनसे शेतक-यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरली आहे. विशेष म्हणजे यावेळी मनसेकडून काठी घुंगरुच्या निनादात शेतकऱ्याच्या प्रतिकात्मक वेशात आंदोलन करण्यात आले.

एपीएमसीच्या कायद्यात बदल केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर आज आंदोलन केले (MNS Protest against central government).

केंद्र सरकारने एपीएमसीच्या कायद्यात बदल करून मोठया उद्योजकांना शेती व्यवसायात शिरण्यासाठी लाल गालिचा अंथरला आहे अशी टीका मनसेने केली. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या नावाखाली मोठया उद्योजकांना शेती व्यवसाय देण्याचा सरकारने घाट घातला आहे. यावर महाराष्ट्र राज्यातील सर्वपक्षीय नेते मौन बाळगून बसले आहेत, असा आरोप यावेळी मनसेने केला आहे.

धान्याशी निगडित शेतीबाबत केंद्र सरकारने हा तुघलकी निर्णय घेतला आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. या आंदोलनात मनसे सैनिक बाळासाहेब शिंदे, प्रसाद घोरपडे, पप्पू शिंदे, मयूर आदि सहभागी झाले होते. यावेळी सरकारला नारळ भेट देऊन निषेध करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER