महत्वाच्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष वळ्वण्यासाठी शिवसेनेकडून कंगनाचा कांगावा – मनसे

Kangana Ranaut-Sanjay Raut-MNS

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput) प्रकरणावरून सतत विधान करणारी अभिनेत्री कंगना राणौतनं (Kangana Ranaut) आता राज्य सरकारलाच लक्ष्य केले आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि कंगना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगला आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत आहे, असे विधान केल्यानंतर शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. तर मुंबईत येणारच. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान कंगनानं दिलं आहे. शिवसेना विरुद्घ कंगना वादावर आता मनसेनं भाष्य केलं आहे.

ही बातमी पण वाचा:- ‘कंगना तो एक बहाना है’,’बेबी पेंग्विन को बचाना है’ : नितेश राणे 

शिवसेना आणि कंगना वादामागे वेगळेचं कारण असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी सांगितलं आहे. सध्या राज्यात विविध प्रश्न आहेत. लोकांचे हाल होत आहेत. त्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना नेते कंगनाला इतकं महत्त्व देत आहेत, असा दावा त्यांनी केला. ‘सध्या मंदिरात कोणालाही जाता येत नाही. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे उपचाराअभावी हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री घरात बसल्यानं जनतेत नाराजी आहे. रेल्वेसेवा सुरू नसल्यानं लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत,’ अशा शब्दांत देशपांडेंनी शिवसेनेवर प्रहार केला आहे.

राज्यातील असंख्य प्रश्नांवरून जनतेचं लक्ष वळ्वण्यासाठी ज्या व्यक्तीच्या वक्तव्याला पाच पैशांची किंमत नाही, त्याला शिवसेनेचे नेते किंमत देत आहेत. ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असले विधानं करत आहे. त्या व्यक्तीनं प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नक्कीच नाही. पण शिवसेना मुद्दाम जाळ्यात अडकतेय का हा प्रश्न आहे. इतर सगळ्या गोष्टींवरून लक्ष विचलित करून या एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत व्हायला हवं, हा शिवसेनेचा प्रयत्न आहे का, त्यासाठी काही षडयंत्र रचलं जात नाही ना, याचा विचार जनतेनं करायला हवा, असं देशपांडे म्हणाले.

बातम्यांच्या

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER