चीनवरून भारतात येणारी व्यापारी जहाजे थांबली नाही तर, मनसे रस्त्यावर उतरेल

मुंबई: भारताने सर्व चिनी अ‍ॅप बंद केलेत याचे स्वागत आहे. मात्र, आता चीनसोबत आर्थिक व्यवहारही नको करायला. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी म्हटले आहे.

“चीनवरून भारतात येणारी व्यापारी जहाजे (कंटेनर व्हेसल्स) कधी बंद करणार. हे थांबले नाही तर मनसैनिक रस्त्यावर उतरून याचा जाब विचारेल आणि त्याची सर्व जबाबदारी जेएनपीटी प्रशासनावर राहील”, असा इशारा ठाकूर यांनी जेएनपीटी प्रशासनाला दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणावरही टीका केली.

संदेश ठाकूर म्हणाले, “सर्व चिनी अ‍ॅप बंद केलेत हे स्वागतार्ह आहे. पण चीनसोबत आर्थिक व्यवहार तरी कशाला, त्यांच्याशी व्यापार उद्योग हवाच कशाला”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
भारतातल्या विशेषतः महाराष्ट्रातील कोणत्याही बंदरात चिनी जहाजे कशी काय लावली जातात त्यांच्याशी व्यापार उद्योग हवाच कशाला असे प्रश्न संदेश ठाकूर यांनी विचारले आहे.

“संपूर्ण जगाला कोरोनाच्या खाईत लोटणारा देश म्हणून चीनवर सध्या जगभरातून टीका होत आहे. त्यातच भारताच्या सीमेवर चिनी सैनिकांनी गलवाण खोऱ्यामध्ये केलेल्या हरकतींमुळे भारतीयांमध्ये चीनबद्दल संताप आहे. चिनी सैनिकांनी कपटाने आपल्या सैनिकांना मारल्याचा ही संताप नागरिकांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने 59 चिनी ऍप बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचे जोरदार स्वागत भारतीय नागरिकांनी केले आहे”, असेही ठाकूर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER