‘शिवसेनेने सत्तेची लाचारी सोडल्यास औरंगाबादचे नाव संभाजीनगर करु शकेल’ – मनसे

मुंबई :- औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) असे नामांतर करण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे सरकारला आघाडीतील मित्रपक्षाकडूनच विरोध होताना दिसत आहे. काँग्रेसचा (Congress) कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोधच आहे, महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) ध्येय सर्वसामान्यांचं कल्याण करणं हेच आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेवर (Shivsena) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

शिवसेना सत्तेसाठी लाचार आहेत. शिवसेनेने औरंगाबाद विमानतळाचे नाव संभाजीनगर करण्यासाठी केंद्राला पत्र पाठवले ही धूळफेक आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आता मुख्यमंत्री आहेत. त्यांनी विमानतळाचे नाव बदलण्यापेक्षा शहराचे नाव बदलावे. मात्र शिवसेना सत्तेच्या लाचारीमुळे औरंगाबादचे नाव संभाजीनगर करूच शकत नाही. त्यांनी सत्तेची लाचारी सोडली तरच नामांतर शक्य होईल, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेत जाणाऱ्या वसंत गितेंना मनसेची ऑफर, गितेंचेही मनसेला तोडीस तोड उत्तर…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER