मनसेचा नवीन ध्वज वादाच्या भोवऱ्यात ; राजमुद्रेसाठी विनोद पाटील देणार कायदेशीर लढा

Raj Thackeray

मुंबई :- ज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षदेखील नव्या भूमिकेत समोर येत आहेत. नव्या भूमिकेसह मनसे आपला झेंडादेखील बदलत आहे. मनसेच्या नव्या झेंड्यावर राजमुद्रा घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील याविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री ज्या खुर्चीवर बसलो आहेत ती पेशव्यांची आहे हे लक्षात ठेवावे : उदयसिंह पेशवे

आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. मात्र राजमुद्रेचा वापर राजकीय पक्षांनी टाळावा. राजमुद्रेचा झेंड्यावर वापर करण्यास सुरुवात केल्यास, राजमुद्रेचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. तरीदेखील मनसेकडून राजमुद्रा ध्वजावर घेतल्यास, कायदेशीर काय करता येईल ते पाहू, असंही विनोद पाटील म्हणाले. किंबहुना राज्य सरकार आणि केंद्र सरकारसमोर हा प्रश्न उपस्थित करू, असे विनोद पाटील म्हणाले आहेत.

राजमुद्रा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणीही राजमुद्रेचा वापर राजकारणासाठी करू नये, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात विनोद पाटील यांनी राज ठाकरे यांना विनंतिपत्रही पाठवले होते. मात्र त्याचे काहीही उत्तर मिळाले नाही.