मनसे आक्रमक; अहमदनगरचे नाव अंबिकानगर? शहरात पोस्टर झळकवले

Maharashtra Today

अहमदनगर : अहमदनगर शहराचे नाव अंबिकानगर करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. शहराचे नाव अंबिकानगर करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कायनेटिक चौक येथील सर्कलला नामांतराचे फलक लावून आंदोलन करण्यात आले होते. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी शहरातील मुख्य ठिकाणी अंबिकानगरचे पोस्टर लावण्यात आले. राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या छायाचित्रासह अंबिकानगर शहरात(Ahmednagar as Ambikanagar) आपले स्वागत आहे, अश्या आशयाचे पोस्टर ठिकठिकाणी दिसून आले.

औरंगाबादच्या पाठोपाठ अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करावे यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नामांतराच्या मुद्द्यावरून अनेक वेळा आंदोलने केली आहेत. परंतु शुक्रवारी अहमदनगर शहराच्या स्थापना दिवशी केलेल्या आंदोलनामुळे नामांतराच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मनविसेच्या या आंदोलनामध्ये सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश गायकवाड, स्वप्निल वाघ, प्रमोद ठाकूर, ओमकार काळे, योगेश गुंड, पांडुरंग काळे, बंटी जगदाळे, महादेव दहिफळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नामांतराची मागणी करताना मनसेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘अहमदनगर शहराचे नाव पूर्वी अंबिकानगर असे होते. त्याचे दाखले शिव स्वराज्यात देखील मिळतात. त्यामुळे अहमदनगरचे नाव हे अंबिकानगर व्हायलाच हवे. शहर स्थापना दिनी अंबिकानगर नामकरणाचे फलक लावून आम्ही प्रशासन, राज्य सरकार यांच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अंबिकानगर असं नामकरण होण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच जनआंदोलन उभारू, असा इशारा मनसेच्या सुमित वर्मा यांनी दिला आहे.

 

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button