…तर शेवटी आम्हाला खळ्ळखट्याक करावं लागेल ; मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा

Raju Patil

मुंबई : कल्याण-शीळ (Kalyan shil Road) रोडच्या कामाच्या दर्जावरुन मनसे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी आक्रमक पवित्रा आहे.कंत्राटदार कामाचा दर्जा दाखवत नसतील तर आम्हाला शेवटी खळ्ळ खट्याक करावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिला .

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण-शीळ रोड हा 6 पदरी करून यावर कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. हे काम युद्धपातळीवर चालू असून कल्याण फाटा ते पालवा पर्यंत जवळपास 80% काम पूर्ण झालंय. तर पुढील रस्त्यावर सुद्धा कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम चांगल्या दर्जाचे केले जात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कारण याच नवीन काँक्रीट रस्त्याला आता खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी क्रॅक सुद्धा गेलेले दिसून येतात. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीकडे पत्र सुद्धा दिले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे आता दिसून येत आहे.

त्यामुळे मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून कामाचा दर्जा दाखवत नसतील शेवटी खळ्ळ खट्याक करावे लागेल असा इशाराच मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER