मनसे आमदार राजू पाटलांनी नागरिकांसाठी खुला केला वडवली उड्डाणपुल

कल्याण : अकरा वर्षापासून काम सुरु असलेल्या कल्याण वडवली रेल्वे उड्डाणपूल तयार झाला. आज पूलाचे लोकार्पण होते. मात्र काही कारणास्तव लोकार्पण कार्यक्रम स्थगित झाला. तीच वेळ साधत मनसे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी वडवली उड्डाणपूल नागरीकांसाठी खुला केला. पूल खुला होताच तात्काळ त्या पूलावर वाहतूक सुरु झाली. यावेळी एकच जल्लोष वाहन चालकांनी केला.

कल्याण डोंबिवली महापालिकेचा आजचा दिवस पूल दिवस होता. डोंबिवलीत कोपर पूलाचे गर्डर आज दाखल झाले आहे. गर्डर टाकण्याचे काम सुरु झाले आहे. गर्डर पूलावर सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये चांगली जुंपली. संध्याकाळी मनसेचे कार्यकर्ते आमदार राजू पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष उ्ल्हास भोईर, अशोक मांडले वडवली पूलानजीक पोहचले. त्यांनी पूलाला लावले पत्र उखडून फेकून दिले आणि पूलाचे उद्घाटन केले.

यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. पूलावरुन त्वरीत वाहतूक सुरु झाली. या वेळेस काही लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते. पूलाचे लोकार्पण केडीएमसी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे , खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित होणार होते. ते आले नाही. त्यांच्या जागी मनसे आमदार राजू पाटील पोहचले होते. काही कारणास्तव आजचा लोकार्पण कार्यक्रम जो पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होता. तो रद्द झाला. नागरीकांना ताटकळत ठेवण्यापेक्षा पूल खुला व्हावा यासाठी या पूलाचे लोकार्पण केले असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. कोपर पूलावरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी सेना-भाजप दोघांवर निशाणा साधला. केवळ इव्हेंट करणाऱ्यांचे हे काम आहे. असा टोलाही लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER