राज ठाकरेंचे गडकिल्ले प्रेम; प्रतापगडाच्या दुरुस्तीसाठी मनसे आमदाराकडून मोठी मदत

Raju Patil-Raj Thackeray

मुंबई : राज्यातील किल्ले वाचले पाहीजे त्याचे सौदर्य टीकून राहीले पाहीजे यासाठी मनसेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) सतत प्रयत्नशील असतात. राज साहेब ठाकरे यांचे गडकिल्ल्यांवरील प्रेम हे जगजाहीर आहे. गडकिल्ले वाचवले पाहिजेत आणि त्यांचे संवर्धन केले पाहिजे असे नेहमीच राज ठाकरे सांगत असतात. आपल्या साहेबांचे गडकिल्ले प्रेम व त्यातूनच प्रेरणा घेऊन मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी पाच लाख रुपयांची मदत केली आहे.

देशभरातील दुर्गप्रेमींचे आवडते ठिकाण असलेल्या प्रतापगडाच्या माचीची वळणदार तटबंदी ही दुर्ग बांधणीतला परमोच्च आविष्कार मानली जाते.

यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माचीच्या तटबंदीतील डोंगर खचला आहे.त्याच्या दुरुस्तीला एकवीस लाख रुपयांचा खर्च असून सह्याद्री प्रतिष्ठान लोकवर्गणीतून हे काम करायचे ठरवले त्याला नागरिकांनीही मदत करायला सुरुवात केली आहे. हे कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी मनसेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER