मनसेचे आमदार राजू पाटील कोरोना पॉझिटिव्ह

Raju Patil - maharastra today

मुंबई : राज्यात आता करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसह सर्वच शहरांमध्ये मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी, आमदार, खासदरांसह अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात अडकत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना देखील करोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच, जिल्हासंघटक हे देखील करोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले आहे.

गेले वर्षभर करोनासोबत लपंडाव खेळत होतो, पण तुर्तास करोनाच्या तावडीत सापडलोच ! गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास चाचणी करावी. करोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन, असं ट्विट करत राजू पाटील यांनी माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER