वाढीव वीज बिलाबाबत मनसेची बैठक; अमित ठाकरे उपस्थित

मुंबई :- वाढीव वीज बिलावरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काहीही संगनमत नसल्याचे पाहताच वाढीव वीज बिलाबाबत सरकार कधी निर्णय घेणार या मागणीसाठी मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.

या बाबतची बैठक मनसेने आज बोलावली आहे. या बैठकीला राजपुत्र, मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची प्रमुख उपस्थिती आहे.

वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून मनसेची सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. मनसे नेते, सरचिटणीस यांची बैठक होणार आहे. बैठकीत आंदोलनाबाबत रणनीती ठरवली जाणार आहे. मनसे पक्ष कार्यालय राजगड येथे ही बैठक होईल. बैठकीसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, सरचिटणीस संदीप देशपांडे, दिलीप धोत्रे याशिवाय राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेही हजर आहेत.

दरम्यान, मनसेच्या वाढीव वीज बिलाच्या आंदोलनाला भाजपनेही पाठिंबा दर्शवला आहे.

ही बातमी पण वाचा : वाढीव वीजबिल भरणार नाही ; अनाठायी निर्णय घेऊ नका : कृती समितीचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER