‘कृष्णकुंज’वर मेगाप्लॅन, मिशन मुंबई ; अमित ठाकरेंच्या जोडीला संदीप देशपांडे

MNS-krishnakunj

मुंबई : मुंबई : कल्याण-डोंबिवलीतील मनसेच्या दोन नेत्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली. या पार्श्वभूमीवर ‘कृष्णकुंज’वर (krishnakunj) खलबतं सुरू झाली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अमित ठाकरे (Amit Thackeray), बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी मनसेने (MNS) तयार केली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह विविध मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी बैठकीनंतर दिली.

मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी तयार केली आहे. ही कमिटी त्या लोकसभेत जाऊन आढावा घेणार आहे. त्याचा अहवाल २५ फेब्रुवारीपर्यंत राज ठाकरे यांना देण्यात येणार आहे, असेही सरदेसाईंनी सांगितले. मुंबईप्रमाणे मुंबईबाहेर ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली यासाठी एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी तयार केली जाणार आहे. मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अभिजित पानसे, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, सरचिटणीस संजय नाईक, राजा चौगुले या बैठकीला उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : अमित ठाकरे संयमाने उत्तम प्रकारचं काम करतील : बाळा नांदगावकर 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER