गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या वादात मनसेची उडी

gangubai - kathiawadi - Maharastra Today

मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘गंगूबाई कठियावाडी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात गंगुबाई काठियावाड यांच्या कुटुंबाची बदनामी होत असल्याचा आरोप करत मुंबईतील माझगाव न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपट अगदी सुरुवातीच्या दिवसांपासूनच वादात सापडल्याने चित्रपट निर्मात्यांच्या अडचणीत वाढ झाली.

यासंदर्भात कामाठीपुरा रहिवाशांनी मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची आज (5 मार्च) भेट घेतली. त्यामुळे मनसे आता या प्रकरणात मध्यस्थी करणार आहे. चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याकडे यांच्याशी लवकरच संवाद साधून रहिवाशांची बाजू मांडणार असल्याचे, मनसेच्यावतीने सांगण्यात आले आहे. ‘कामाठीपुरा’ हा उल्लेख संपूर्ण चित्रपटातून वगळावा, अशी मागणी मनसे चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याकडे करणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारत आहे.

दरम्यान गंगूबाई काठियावाडी या चित्रपटावर आक्षेप घेण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी खुद्द गंगूबाई यांच्या मुलाने देखील या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता. गंगूबाई यांचे पुत्र बाबूजी रावजी शाह यांनी आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि प्रख्यात लेखक हुसेन जैदी यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. या सर्वांवर यापूर्वी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रख्यात लेखक हुसेन जैदी यांनी ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात गंगूबाईंचा उल्लेखही करण्यात आला आहे. याचा पुस्तकावर हा चित्रपट तयार केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER