मनसेचा मोर्चा म्हणजे राजकीय स्वार्थासाठी मोर्चा काढून केलेली स्टंटबाजी : इम्तियाज जलील

MNS MahaMorcha - Imtiaz Jaleel

औरंगाबाद : मुंबईतल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावा या मागणीसाठी काल मनसेच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आले होते.राज ठाकरे च्या या महामोर्च्यावर एमआयएम’ चे खासदार इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली आहे. पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलायलाच पाहिजे, याबद्दल कुणाचे ही दुमत असू शकत नाही. पण केवळ राजकीय स्वार्थासाठी मोर्चा काढून लोकांना वेठीस धरण्यासाठी केलेली ही स्टंटबाजी आहे, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला .

न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही ; पीडितेच्या नातेवाईकांचा पवित्रा

मुंबईत कुठे किती घुसखोर आहेत याची माहिती आपल्याला असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले होते. मग त्याच घुसखोरांचा व्हिडिओ सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला दाखवून हे काम करता आले असते. पण शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडली, त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी केलेला राज ठाकरेंचा हा सगळा खटाटोप असल्याची टीका देखील जलील यांनी केली मनसेच्या या मोर्चाबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘ राज ठाकरे यांनी मुंबईत काढलेला महामोर्चा जर शेतकरी, बेरोजगार तरुणांच्या प्रश्नावर काढला असता तर अधिक बरे झाले असते. पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना राज्यातून, देशातून हाकललेच पाहिजे. आमची देखील तीच भूमिका आहे. पण त्यासाठी मनसेला मोर्चा काढण्याची गरज नव्हती, असे जलील म्हणाले .