संबंधांसाठी मलाही कॉल, मनसेच्या मनीष धुरींचेही रेणू शर्मावर गंभीर आरोप

manish Dhuri

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माबाबत धक्कादायक खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये (BJP) असलेले कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. रेणू शर्मा यांनी आपल्यालाही हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता, असं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं. तर दुसरीकडे मनसे (MNS) नेते मनीष धुरी (Manish Dhuri) यांनीही रेणू शर्माने फोन करुन, जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धुरी म्हणाले की, जर रेणू शर्माच्या जाळ्यात फसलो असतो तर 2008-09 मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता. रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे. कृष्णा हेगडेंनी 2010 मध्ये अनुभव घेतलाय. पण मी 2008- 2009 मध्ये फसणार होतो, मात्र माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो. ही (रेणू शर्मा) आणि हिचं कुटुंब यामधीलच आहे असं वाटतंय, असं मनीष धुरी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER