शिवसेनापाठोपाठ भाजपचाही मनसेला मोठा धक्का; मनसे नगरसेवक भाजपच्या वाटेवर

BJp & MandarHalde

मुंबई : आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मोठ्या राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. सोमवारी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम (Rajesh Kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्यानंतर मनसेला मंगळवारी दुसरा धक्का बसला आहे. मनसेचे नगरसेवक मंदार हळबे (Mandar Halbe) हे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. सध्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात शिवसेना-भाजपने मनसेला खिंडार पाडण्याचं काम सुरू केलं आहे. मनसेचे अनेक पदाधिकारी शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. मंदार हळबे हे आतापर्यंत दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत मनसेकडून डोंबिवली मतदारसंघाचे  तिकीट हळबेंना देण्यात आले होते, तेव्हा ३७ हजारांनी मंदार हळबे यांचा पराभव झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER