राज ठाकरेंचा थाट ; सरकारने सुरक्षेत कपात करताच मनसेकडून ‘महाराष्ट्र रक्षक’ तैनात

Raj Thackeray

मुंबई :- राज्य सरकारने मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर आता यांची सुरक्षा ‘महाराष्ट्र रक्षक’ करणार आहेत. मनसेचे सरचीटणीस नयन कदम (Nayan Kadam) यांनी खास राज ठाकरेंच्या रक्षणासाठी ही टीम तयार केली आहे.

राज्य सरकारने 10 जानेवारीला राज्यातील भाजपचे बडे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या कपातीचा निर्णय घेतला. या निर्णयांतर्गत राज यांची झेड (Z) दर्जाची सुरक्षा काढून त्यांना वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवली गेली. या निर्णयामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेत सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली . आम्हाला सरकारच्या सुरक्षेची गरज नसून राज ठाकरे यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे मनसेच्या नेत्यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर आता मनसेचे सरचीटणीस नयन कदम यांनी राज यांच्या संरक्षणासाठी खास ‘महाराष्ट्र रक्षक’ नावाची टीम तयार केली आहे.

मनसेने तयार केलेली ही महाराष्ट्र रक्षक टीम राज यांचे संरक्षण करणार आहे. यापुढे ही टीम काळे टी-शर्ट्स घालून राज यांच्या आजूबाजूला दिसेल. राज ठाकरे ज्या-ज्या ठिकाणी जातील त्या सर्व ठिकाणी मनसेची ही महाराष्ट्र रक्षक टीम उपस्थित असेल.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंची मुंबईत मनसेच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER