लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेनी केली मुख्यमंत्र्यांकडं ‘ही’ मागणी

Raju Patil & Uddhav Thackeray

मुंबई : आज 16 जानेवारी रोजी कोरोना (Corona) लसीकरणाला महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरात सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे एक मागणी केली आहे.

उद्धव ठाकरेजी आजपासून महाराष्ट्रा सोबतच देशात पण कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे आता तरी सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा चालू करा, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केली आहे. यासंदर्भात पाटील यांनी ट्विट केलं आहे. नोकरीसाठी मुंबईकडं धावणारा मध्यमवर्ग आपली अर्धी कमाई प्रवासावर खर्च करून व वाहतूक कोंडीत रोज रोज अडकून थकला असल्याचंही राजू पाटील यांनी म्हटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER