‘पाच नगरसेवक परत आले तर मोठी लढाई जिंकले असे समजू नका’

CM Uddhav Thackeray

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप अजित पवार यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर पाच नगसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र या सर्व घडामोडींवर मनसेने निशाणा साधला आहे.

मनसेने नेते वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे पारनेरमधील झालेल्या घडामोडीनंतर शिवसेनेवर टीका केली आहे. वसंत मोरे म्हणाले की, आम्ही डरकाळी फोडली आणि ५ पळून गेलेले नगरसेवक परत आले म्हणजे खूप मोठी लढाई जिंकली असे समजू नका. हा भारत देश आहे, इकडे पतिव्रता असलेल्या सितामाईला ही रावणाने पळवून नेल्यानंतर जेव्हा परत आणलं गेलं तेव्हा सीतामाईलाही अग्नी परीक्षा द्यावी लागली होती. त्यामुळे तुमचे नगरसेवक कुठली परीक्षा देणार असा प्रश्नही वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच मला अभिमान आहे मी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा नगरसेवक आहे. जो गेला उडत तो गेला उडत आम्ही कोणाच्या पाया पडत नाही, असा टोला देखील वसंत मोरे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER