महिलांच्या प्रश्नांवरून मनसेचा आदित्य यांना टोला

Aditya Thackeray-Shalini Thackeray

मुंबई :- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पर्यटन खात्यासाठी वेगळा अर्थसंकल्प असावा, असे मत नाईट लाईफबद्दल बोलताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. मात्र आदित्य ठाकरे यांच्या या मागणीवरूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य यांच्यावर टीकास्त्र सोडले.

“तुम्ही ज्या खात्याचे मंत्री बनणार त्या खात्याचा वेगळा अर्थसंकल्प आवश्य वाटतो; पण महिलांच्या अधिकारांसंदर्भातील अर्थसंकल्प गरजेचा वाटत नाही. ” असा टोला शालिनी ठाकरेंनी ट्विटवरून लगावला आहे.

शालिनी ठाकरे यांनी ‘मुंबईतील प्रतिसाद पाहून ठाण्यात रात्रजीवन’ या बातमीच्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट ट्विटवरून शेअर करत आदित्य यांच्यावर टीका केली. “व्वा रे व्वा! तुम्ही ज्या खात्याचे मंत्री बनणार, त्या खात्याचा ‘वेगळा’ अर्थसंकल्प तुम्हाला आवश्यक वाटतो पण महिलांच्या न्याय्य अधिकारांबाबत विशेष अर्थसंकल्प, जेंडर बजेट सादर करून त्वरित अंमलबजावणी करणं तुम्हाला गरजेचं वाटत नाही. ” असा टोला शालिनी ठाकरेंनी लगावला आहे. तसेच ट्विटच्या शेवटच्या ओळीत त्यांनी, “तुमच्या या ‘अनास्थेचा हिशोब’ महिलांना मांडावाच लागेल. ” असा इशाराही आदित्य यांना दिला आहे.

शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षेवरून गदारोळ; विधानसभेचे काम स्थगित


Web Title : MNS Leader shalini thackeray slams tourism minister aditya thackeray

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)