तडजोड, लाचारीमुळे व्यवसाय होतो, पण ब्रॅण्ड रसातळाला जातो ; मनसेचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

Sandeep Deshpande-sanjay-raut

मुंबई :“महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्ड चा (Thackeray Brand) जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल. ” अशा शब्दांत शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना साद घातली आहे . मात्र, राऊत यांच्या या भूमिकेवर मनसे नेत्यांनी टीका करणे अद्यापही थांबवले नाही .

मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आजही टि्वट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “विचार,संयम’ स्वाभिमान या मुळे “ब्रॅण्ड”मजबूत होत असतो. या उलट तडजोड,लाचारी यामुळे व्यवसाय तर होतो पण ब्रॅण्ड रसातळाला जातो” असे देशपांडे म्हणाले.

दरम्यान ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून हे ब्रॅण्डच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे, असे संजय राऊत यांनी रोखठोक या सदरात ‘मुंबईचे खच्चीकरण कोणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची!!’ या लेखात म्हटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER