कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ?,मनसेचा शिवसेनेला सवाल

Raj And Uddhav Thackeray

मुंबई : मुंबईत कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. याचा सर्वात मोठा फटका हा सामान्यांना बसला आहे. वेगवेगळ्या पातळीवर नागरिकांना मदत केली जात आहे. शिवसेनेकडून केलेल्या मदतीवर मनसेच्या संदीप देशपांडेंनी टीका केली आहे.

शिवसेनेकडून कुलाबा विधानसभेच्या परिसरात महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सचं वाटप करण्यात आले होते. मात्र या पॅड्सच्या पॅकेटवर मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही आदित्य ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. याच सर्व प्रकरणावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विट करून सवाल केला आहे की,’कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही?,आता म्हणतील राजकारण नको. आधीच फोटो छापले होते का?’ असा देखील प्रश्न विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला