‘कंपाऊंडर’ डोक्यावर पडलेत का? सामनातील मथळ्यावरुन संदीप देशपांडेंची खोचक टीका

sandeep deshpande and Sanay raut

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी कोरोना लसीकरणाबाबात दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीवरुन शिवसेना आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे. सामनामध्ये कोरोना लसीकरणाच्या बातमीला लसकर-ए-कोरोना (Laskar-e-Corona) असे शिर्षक देण्यात आलं आहे. संदीप देशपांडेंनी (Sandeep Deshpande) यावर निशाणा साधला आहे.

कोरोनाच्या लशीची तुलना लष्कर ए तोयबा बरोबर ?? ”कंपौंडर” डोक्यावर पडलेत का??? असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. देशपांडे यांनी सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा फोटो देखील शेअर केला आहे. कोरोनाच्या लसीची तुलना लष्कर-ए-तोयबा बरोबर कशी केली जाऊ शकते, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही देशपांडेंनी निशाणा साधला आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना मंत्रिपद? शरद पवारांशी बोलण्याचे सुप्रिया सुळेंचे आश्वासन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER