मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत, कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? मनसे नेत्याचा टोला

Sandeep Deshpande - CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात लवकरच अनलॉक 5 (Unlock-5) ची घोषणा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं होतं. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला .

राज्यात अनलॉक 5 सुरू होणार आहे, मुख्यमंत्र्यांनी हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? असा टोलाही संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाचे (Corona) संकट अजूनही कमी झालेले नसले , तरी अर्थगाडा व जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही दिवसांत सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले असून, ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंटही खुली होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनांच्या प्रतिनिधींशीसोबत झालेल्या बैठकीत दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER