मनसेचे नगरसेवक फोडले तेव्हा अनिल परबांचा मास्टरस्ट्रोक, आता तेच गुन्ह्याचे मास्टरमाईंड ; मनसे नेत्याचा टोला

Sandeep Deshpande-Anil Parab.jpg

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी लिहिलेल्या पत्राने खळबळ उडाली आहे . या पत्रात वाझेंनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. यावरून मनसेने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मनसेचे नगरसेवक फोडले तेव्हा अनिल परबांचा (Anil Parab) मास्टर स्ट्रोक म्हणत होते. मात्र अनिल परब हे गुन्ह्याचे मास्टरमाईंडदेखील आहेत. ते स्वतः वकील आहेत त्यांना शपथ घेऊन खोटं बोलू नये हे माहिती आहे. शपथेनंतर खोटं बोलून ते गुन्हा करत आहेत, असा टोला मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.

दरम्यान निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी लिहिलेल्या पत्रातअनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परब यांनीही आपल्याला वसूली करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट वाझे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वाझेंनी केलेल्या या आरोपांमुळेच अनिल परब यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दोन मुलींची शपथ घेण्याची वेळ आली आहे. परब यांनी वाझे यांचे सर्वच आरोप फेटाळून लावले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button