रात्री 10च्या सुमारास टोलनाक्यावर भली मोठी रांग ; फास्टॅगवरून मनसे नेत्या रुपाली पाटील भडकल्या

Rupali Thombre Patil

कोल्हापूर :  बुधवारपासून देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर फास्टटॅग लागू करण्यात आला आहे. फास्टटॅगच्या पार्श्वभूमीवर अनेक टोलनाक्यांवर काल मोठी गर्दी पाहायला मिळत होती. त्यातच मंगळवारी रात्री किणी टोलनाक्यावर 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. मुळे नवा वाद पाहायला मिळाला. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali-patil thombre) यांची किणी टोल नाक्यावर (Toll Naka) फास्टॅगवरुन वादावादी झाली.

फास्टॅग लागू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक होते. त्यावेळी रुपाली पाटील किणी टोल नाक्यावरुन पुण्याच्या दिशेनं निघाल्या होत्या. पण टोल नाक्यावर प्रचंड मोठी रांग लागली होती. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी थोडी वादावादी झाली. तेव्हा रुपाली पाटील यांच्या मदतीला टोल नाक्यावरील अन्य वाहन चालकही आले होते. रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास रुपाली पाटील पुण्याच्या दिशेनं निघाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER