राज ठाकरेंच्या मनसेसैनिकांचे पाकिट मारणे पडले भारी

mns-soldiers-catch-the-thief

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर आहे. शहरात दाखल झाल्यानंतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज यांना भेटण्यासाठी पोहोचले असता गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी संधी साधली. परंतु, मनसैनिकांनी या चोरट्याला पकडून चांगलाच चोप दिला.

राज ठाकरे आज सकाळीच नाशिक शहरात दाखल झाले आहे. नाशिकच्या हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये राज ठाकरे मुक्कामी थांबले आहे. त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीत कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे गर्दीत घुसले होते. एका कार्यकर्त्याचे पाकीट मारताना हा प्रकार उघडकीस आला. मनसेच्य कार्यकर्त्यांनी पाकीट मार संशयिताला पकडले आणि चांगलाच चोप दिला. या चोरट्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चोरट्याकडून हजारो रुपये आढळून आले आहे. पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER