बाळासाहेबांचा वाघ ते राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार’, मनसे नेते प्रकाश कौडगे यांचे निधन

मनसे नेते प्रकाश कौडगे यांचे निधन

नांदेड : एकेकाळी शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा वाघ म्हणून ओळख असलेले आणि वर्तमानात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार मनसेचे नांदेड जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे (Prakash Kaudge) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हैद्राबादमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदीर्घ काळ कौडगे यांनी शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख पद भूषवले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता.

प्रकाश कौडगे यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी मनसेत प्रवेश केला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कौडगे यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला होता. पक्ष प्रवेशासोबतच राज ठाकरे यांनी कौडगे यांच्यावर मनसेच्या नांदेड जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. नायगांव, भोकर आणि हदगांव या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. नांदेडमध्ये सुरुवातीच्या काळात कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या कौडगे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यांच्या मनसेप्रवेशामुळे नांदेडमध्ये मनसेची ताकद आणखीनच वाढली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button