मनसेचा टोला : शिवसैनिक झालाय गरीब-बापडा; सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा

Uddhav Thackeray-mns

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या मेळाव्यासाठी शिवसेना संघटक हेमराज शहा  यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे.

यावरून मनसेने (MNS) शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला. मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबई मा जलेबी ने फाफडा,उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपडा… शिवसैनिक झालाय गरीब-बापडा, सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा, असे म्हणत कीर्तिकुमार शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या गुजराती बांधवांच्या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. येत्या १० तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल १०० गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER