बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होताना ‘हा’ मनसे नेता गहिवरला

balasaheb-thackeray-And-Bala-Nandgaonkar

मुंबई : मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala nandgaonkar) यांनी मुंबईतल्या कुलाबा येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. बाळसाहेबांच्या चरणी नतमस्तक होताना नांदगावकर यांना चांगलंच गहिवरून आलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी मी मुंबईत नसल्यानं  पुतळ्याचं दर्शन घेता आलं नाही. त्यामुळे मी आज त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे. बाळासाहेबांनी सगळ्या मराठी माणसाच्या मनात अग्नी पेटवला आहे.

त्यामुळे मराठी माणूस, हिंदू आणि इतर भाषिक लोकांमध्येदेखील त्यांच्याविषयी प्रेम आहे. बाळासाहेबांना अभिवादन करून खूप बरं वाटलं, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या कुलाब्यात त्यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले .

या कार्यक्रमाला मनसेप्रमुख राज ठाकरेही उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाला बाळा नांदगावकर उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. बाळा नांदगावकर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ पोहचले. त्यांच्या पुतळ्यावर गुलाबाच्या फुलांची उधळण करत बाळासाहेबांचा त्यांनी आशीर्वाद घेतला. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते भावुक  झाल्याचे पाहायला मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER