
मुंबई : श्री मलंगगडावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते रविवारी रात्री साडेसात वाजता आरती करीत असताना दोन गट आमने-सामने आले. याप्रकरणी दोन्ही गटांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून चारजणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर घटनेनंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आज मलंगगडावर जाऊन आरती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना काकडवाल गावाजवळ अडवलं आणि नेवाळी पोलीस चौकीत आणलं. त्यानंतर यावेळी अविनाश जाधव यांच्यासोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
मलंगगडावर जाऊन आरती करण्याच्या निर्णयावर अविनाश जाधव ठाम होते. त्यानंतर अविनाश जाधव यांच्यासोबत पोलिसांनी संवाद साधला. मात्र त्यानंतरदेखील २७ एप्रिलला मलंगगडावर जाऊन आरती करणाच्या निर्धार अविनाश जाधव यांनी फेसबुकद्वारे व्यक्त केला आहे. अटकेत असणाऱ्या अविनाश जाधव यांनी फेसबुकद्वारे २७ एप्रिलला मलंगगडावर जाऊन आरती करणार असल्याचा एल्गार जाहीर केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला