राज ठाकरेंच्या बाबतीत अनुचित प्रकार घडला तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील- अविनाश जाधव

Avinash Jadhav

मुंबई :- कोहिनूर मिल प्रकरणाच्या चौकशीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. जवळपास दोन तासांहून अधिक वेळेपासून राज यांची चौकशी सुरू आहे. यामुळे मनसे अधिकारी, कार्यकर्त्यांनी  आक्रमक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत. तर दुसरीकडे ‘राज्यात आणि देशात सरकार दडपशाही करत आहे. राज ठाकरेंनी आम्हाला शांत राहण्याचा आदेश दिला आहे. पण त्यांच्याबाबत काही अनुचित प्रकार घडला तर आम्ही शांत बसणार नाही. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील.’ असा इशारा मनसेचे अधिकारी अविनाश जाधव यांनी दिला आहे.

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांनी सरकारविरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे समर्थकांचे कोल्हापुरात निदर्शने