अखेर अमित ठाकरेंनी ‘तो’ शब्द पळला ; शिक्षक आंदोलकांना वाढीव अनुदानाचा मार्ग मोकळा झाला!

Amit Thackeray

मुंबई : राज्य सरकारने विनाअनुदानित शाळांच्या निधी वितरणाचा जीआर जारी केला आहे. तत्पूर्वी आझाद मैदानात आलेले हजारो शिक्षक त्यांच्या मागण्यांसाठी दोन आठवडे आंदोलन करत होते. आंदोलकांच्या भावना इतक्या तीव्र होत्या की त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर मनसेचे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) आंदोलनस्थळी पोहचले होते. आंदोलकांशी संवाद साधला. “प्रश्न मार्गी लागेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी ठाम उभी आहे अशी ग्वाही आंदोलकांना दिली.” तसेच तातडीने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड ह्यांची भेट घेतली होती. शिक्षण मंत्र्यांनी प्रश्न सोडविण्याचं आश्वस्त केलं. त्यानंतर बुधवारी राज्य सरकारने विनाअनुदानित शाळांच्या निधी वितरणाचा जीआर जारी केला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर मनसेने देखील याबाबत ट्विट केलं आहे. अमित ठाकरेंनी शिक्षक आंदोलकांना दिलेला शब्द पाळला, ३३ हजार १५४ शिक्षकांच्या वाढीव वेतनाचा प्रश्न मार्गी लागला. शिक्षकांच्या २० टक्के वाढीव अनुदानाचा मार्ग मोकळा झाला, असं मनसेने म्हटलं आहे.

मूल्यांकनानंतर पात्र ठरलेल्या विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा व वर्गतुकड्यांना नव्याने २० टक्के वेतन अनुदान, तसेच २० टक्के अनुदान घेत असलेल्यांना २० टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय (जीआर) बुधवारी शालेय शिक्षण विभागाने जारी केला. १४० कोटींच्या या निधीमुळे राज्यातील साधारण ३३ हजार शिक्षकांना लाभ होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER