इम्तियाज जलील यांचा डान्स, खैरेंकडून अटकेची मागणी; खोपकर म्हणतात, नाचताना शरम वाटली पाहिजे

ameya khopkar - imtiaz jaleel - Maharastra Today

मुंबई :- एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करून काल जल्लोष साजरा केला होता. त्यानंतर खैरेंनी जलील यांच्या अटकेची मागणी केली आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनीही जलील यांच्यावर सडकून टीका केली.

“MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमध्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करून नाचताना शरम वाटायला पाहिजे.” असं मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

“हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.” अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.

दरम्यान औरंगाबाद शहरातील कोरोनाला इम्तियाज जलील जबाबदार आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करा, अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली. इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करू, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button