‘….मूँह काला कर चुके हैं !’ मनसेचा संजय राऊतांना टोला

Amey Khopkar - Sanjay Raut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही कंगनावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. ‘मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना,पहिले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूँ… !’ असे ट्विट करत त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. राऊतांच्या या ट्विटला उत्तर देताना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी टोला लगावला आहे.

‘मेरी बेशर्मी को परखने की गुस्ताखी न करना,पहले भी आप कई तूफानों से मूॅंह काला कर चुके है… !’ असे ट्विट खोपकर यांनी केले आहे .

दरम्यान राऊतांच्या या ट्विटवर भाजपा नेते संबित पात्रा यांनीही पलटवार केला आहे. “हेच तर जग विचारतंय… नेमकं ‘हवेली’मध्ये असं काय आहे, की ‘Drugs, Death & Dhoka’ नावाच्या वादळाची दिशा आपण कोणत्याही परिस्थितीत वळवू इच्छिता.” असे ट्विट पात्रा यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER