मनसे कोल्हापूर महापालिका रिंगणात

MNS & Kolhapur MC

कोल्हापूर : कोल्हापूर महानपालिकेच्या निवडणुकीत सक्षम उमेदवार उभा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘खळ्ळ खट्याक’चा वचक असल्याने चांगली कामेही झाली आहेत. तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारी मनसे महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरेल, असा विश्वास मनसेचे नूतन संपर्कप्रमुख जयराज लांडगे यांनी व्यक्त केला.

निवडणूक काळात राज ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्याचे नियोजनही सुरू असल्याचे सांगितले. बैठकीला माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, विजय करजगार, रत्नदीप चोपडे, अभिजित राऊत, मंदार पाटील, नागेश चौगुले आदी उपस्थित होते.

शासकीय विश्रामगृहावर लांडगे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. इच्छुक उमेदवारांचीही निवडणुकीबाबतची मते जाणून घेतली. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी त्यांच्या कामाच्या जोरावर लढत देण्याची तयारी केली असल्याचे सांगितले. राज ठाकरेंना अहवाल सादर करणार बैठकीत महापालिकेच्या किती जागा लढवाव्यात पक्षाची भूमिका काय, याविषयी चर्चा झाली. या बैठकीचा अहवाल रविवारी पक्षप्रमुख राज ठाकरेंकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER