‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, सरकारला ‘शॉक’ देण्यासाठी मनसेची जय्यत तयारी

Uddhav Thackeray & Raj Thackeray

मुंबई : लॉकडाऊन (Lockdown) काळात नागरिकांना आलेल्या वाढीव बिज बिलासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकच आक्रमक झाली आहे. सोमवारनंतर वीज दरवाढीविरोधात आंदोलन करण्याचा निर्धारच मनसेने केला असून दरवाढीविरोधात संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंगबाजी करण्यात आली आहे.

‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या घोषणेलाच लक्ष्य करत ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, अशी खोचक वाक्यं या होर्डिंग्जवर लिहिण्यात आली आहेत. त्यामुळे या होर्डिंग्ज सध्या चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. वीज बिल माफीच्या विरोधात मनसेने दंड थोपटले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल माफ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

त्यामुळे मनसे अधिक आक्रमक झाली असून उद्या सोमवारपासूनच मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनसेने दादर आणि माहीम परिसरात होर्डिंगबाजी करून राज्य सरकारविरोधात वातावरणनिर्मिती केली आहे. ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, आणि ‘तीन तिघाडा, लाईट बिघाडा’, अशा घोषणा या होर्डिंगवर लिहून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. शिवाय सोमवारी भेटूच, शॉकसाठी तयार राहा, असा इशारा देत मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER