‘ठाकरे’ सरकारची मदत पोहचण्यापूर्वी कोकणवासीयांना ‘मनसे’ मदत

Maharashtra Today

सिंधुदुर्ग :- गेल्या आठवड्यात येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Taukae) सर्वात जास्त फटका कोकणाला बसला. चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी (Ratnagiri) या सात जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांनी जाहीर केले. मात्र ही सरकारी मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहचेल हे सांगता येत नाही. अश्यातच ‘ठाकरे’ सरकारची मदत पोहचण्यापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेची(MNS) मात्र मदत पोहचण्यास सुरूवातही झाली आहे.

चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर १० दिवस उलटले तरी तळकोकणात झालेली वाताहत अजूनही पूर्वव्रत झाली नाही. अनेक घरांमध्ये अंधार आहे. पिण्याचं पाणी गढूळ झालं आहे. कोकण दौऱ्यावर असणारे मनसे नेते नुकसानग्रस्तांच्या भेटी घेण्याबरोबरच शक्य तिथे करत आहेत. मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत व सरचिटणीस परशुराम उपरकर, वैभव खेडेकर ह्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. चक्रीवादळांनंतर उद्भवलेल्या वीजजोडणी, पंचनामे, किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय ह्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

सिंधुदुर्गातील मालवणच्या देवबागलाही चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला. पिण्याचं पाणी दूषित आणि वीज प्रवाह खंडित होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक स्वखर्चाने मदतकार्यात सक्रिय झाले. घरोघरी सौरकंदील व दिव्याचं वाटप करण्यात आलं, सुमारे १५,००० लीटर पाणीपुरवठा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button