महात्मा जयंतीनिमित्त मनसेने मुख्यमंत्र्यांना करून दिली महत्वाची आठवण

Mahatma Gandhi jayanti

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छांमध्ये संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक महत्वाची आठवणही करून दिली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवडणूकपूर्व टोलमुक्त महाराष्ट्राच्या वचनाची आठवण करुन त्यांनी करून दिली आहे. तसेच सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधींना अभिवादन म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचा टोलमुक्तीचं वचन देणारा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. सरकार को सन्मती दे भगवान. सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन.’ त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत उद्धव ठाकरे निवडणूक प्रचाराच्या सभेला संबोधित करताना सर्वांना आपल्या वचननाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राचं वचन असल्याचं सांगतात.

उद्धव ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणाले, आपलं सरकार आल्यानंतर आपण महाराष्ट्र टोलमुक्त करु. आपलं सरकार आल्यानंतर काय येणारच आहे. केंद्रात पण आपलं सरकार येणार आणि राज्यात पण येणार आहे. आपण वचननाम्यात लिहिलं आहे हे सरकार आल्यानंतर आम्ही महाराष्ट्र टोलमुक्त करणार. आणि दुसरीकडे मुंबईत येणाऱ्या वाहनांच्या टोलमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आणि याच मुद्द्यावरून देशपांडे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER