कंगनाला मनसेचा छुपा पाठिंबा? सिद्धिविनायक दर्शनावेळी राज ठाकरेंच्या ‘मसल मॅन’चे संरक्षण

MNS & Kanaga Ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मला मुंबईत येण्यापासून कोण रोखतं, असे म्हणत तिने यापूर्वी मुंबईत दिमाखात प्रवेश केला होता. यावेळी तिला दिल्या गेलेल्या सुरक्षेची देशभरात चांगलीच चर्चा झाली होती.

त्यानंतर कंगना मंंगळवारी (२९ डिसेंबर) सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा मुंबईत आली. यावेळी तिच्या दिमतीला मनसेचे (MNS) पदाधिकारी होते. त्यामुळे कंगना आणि मनसेचा काय संबंध? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर कंगनाला मनसेकडून छुपे  संरक्षण दिले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कंगना रनौत मंगळवारी (२९ डिसेंबर) सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आली होती.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यावेळी तिच्यासोबत मनसेचे पदाधिकारी होते. मनसेचे आंबोली विधानसभा मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि त्यांचे बंधू कुशल धुरी कंगना रनौतसोबत होते. कंगनाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना  धुरी बंधू तिच्यासोबत असल्यामुळे मनसेकडून  कंगनाला छुपे संरक्षण दिले असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER