खऱ्या बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्यास मनसेकडून मिळणार पाच हजारांचे बक्षीस !

Raj Thackeray

औरंगाबाद :- भारतात अवैध राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी आक्रमक भूमिका घेत मनसेने मुंबईत विविध भागांत जाऊन शोधमोहीम हाती घेतली होती. मनसेच्या या भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागतही झाले, तर काही प्रकरणात आपल्याच देशातील परप्रांतीय लोकांना संशयित म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडल्याच्या घटना समोर आल्या. त्यावर आता मनसेने नामी शक्कल शोधून काढली आहे. यासाठी औरंगाबादेत आज मनसेच्यावतीने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात येत आहे.

यानिमित्ताने मनसेने आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या शहरात किंवा आसपासच्या भागात पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर राहात असतील तर त्यांची पुराव्यानिशी माहिती देणाऱ्यास पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत मिळालेली माहिती, पुरावे मनसेचे पदाधिकारी पोलिसांना देतील. पोलिसांनी खात्री आणि अधिकृतपणे शिक्कामोर्तब केल्यानंतर घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवून त्याला बक्षीस दिले जाणार आहे.

वडील मुख्यमंत्री झाले तरी, आदित्यने गायकी नाही जोपासली; शिवसेनेचे अमृता फडणवीसांना उत्तर

ही मोहीम राबवण्यासाठी मनसे शहरातील विविध भागांमध्ये विशेष मंडप उभारणार असून नागरिकांना जर घुसखोरांची माहिती असेल तर त्यांनी ती पुराव्यानिशी या मंडपातील मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सुरुवातीला जालना रोडवरील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही मोहीम सुरू केली जाणार आहे. कालांतराने शहरातील काही ठरावीक भागांत मंडप उभारले जातील. अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली आहे.


Web Title : MNS give cash prize them who find pakistani-bangladeshi

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Aurangabad City, Nagpur City, Thane City, Pune City, Mumbai City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)