मनसे नेते संदीप देशपांडेंसह तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

sandeep-deshpande-and-three-other-leaders-police-filed-crime-for-local-protest

मुंबई : कोरोनाचा (Corona) फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बंद करण्यात आलेली लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात यावी , अशी मागणी करत मनसेने काल सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास केला होता. या आंदोलन प्रकरणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यासह तीन जणांविरुद्ध कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे .

मनसेच्या (MNS) या नेत्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असून, सकाळी ११ वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. यात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी (Santosh Dhuri), गजानन काळे, अतुल भगत यांचा समावेश आहे. यानंतर मनसे नेते स्वत: पोलिसांना शरण गेल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या नेत्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे .

ही बातमी पण वाचा : अशोक चव्हाणांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER