जीवाची पर्वा न करता चिमुकल्याचा प्राण वाचवणाऱ्या मयूर शेळकेंचा मनसेकडून सत्कार

Mayur Shelke - Raju Patil

ठाणे : ‘देव तारी त्याला कोण मारी?’ याचा साक्षात प्रत्यय वांगणी रेल्वेस्थानकात पाहायला मिळाला आहे. पॉइंटमन म्हणून वांगणी रेल्वेस्थानकात कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी सेकंदाचाही विलंब न केल्याने एका चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. विशेष म्हणजे अवघ्या काही सेकंदांनी मुलाचा जीव वाचला. त्या चिमुकल्याची आई अंध असल्याने मला त्याचा जीव वाचवायचा होता, असं शेळके यांनी म्हटलं आहे. अश्या या धाडसी मयूर शेळकेंचा (Mayur Shelke) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) सत्कार करण्यात आला.

मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना या धाडसी घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ मयूर शेळके यांचा सत्कार करण्याचे ठरविले. त्याना आपल्या कार्यालयात बोलावून शाल श्रीफळ देत सत्कार केला. दृष्टीहीन आईचा लहान मुलगा फलाटावरून जाताना रेल्वेरुळावर पडला. समोरून भरधाव वेगात ट्रेन येत होती, तो जिवाच्या आकांताने पळाला आणि कशाचीही तमा न बाळगता त्याने त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले; अशा अतुलनीय शौर्याचं-धैर्याचं दर्शन घडले. शाब्बास मयूर!, असे गौरवोद्गार राजू पाटील यांनी काढले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button