
चंद्रपूर :- सरकारी कोळसा कंपनी WCL अंतर्गत काम करणाऱ्या GRN कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आज (१७ फेब्रुवारी) तोडफोड केली.
स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याच्या मुद्द्यावरून हा राडा घालण्यात आला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जीआरएन कार्यालयातील सामानाची मोडतोड करत कंपनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
माहितीनुसार, सरकारी कोळसा कंपनी WCL च्या भटाळी क्षेत्रांतर्गत GRN ही कन्स्ट्रक्शन कंपनी कोळसा खोदण्याचे काम करते. या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याचा आरोप येथील कामगारांनी तसेच या भागातील नागरिकांनी केला होता. या मुद्द्यावरून मनसेने जीआरएन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा चौकशी केली. त्यासाठी अनेकदा निवेदनही दिले. मात्र, जीआरएन या कंपनीच्या प्रशासनाने मनसे तसेच स्थानिकांच्या मागणीवर कोणतीही कार्यवाही केली नाही.
ही बातमी पण वाचा : तळेगावातील सोमाटणे टोलनाक्याला विरोध; राज ठाकरेंची भेट घेण्यास स्थानिक ‘कृष्णकुंज’वर
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला