कोकणवासियांसाठी सवलतीच्या दरात बसेस आणि विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मनसेची मागणी

Kokan railway

रत्नागिरी/प्रतिनिधी : गणेशोत्सवासाठी गावी जाऊ इच्छिणाऱ्या कोकण वासियांसाठी सवलतीच्या दरात बसेस आणि विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

मुंबई, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ येथे कोकणातील नागरिक खूप मोठ्या प्रमाणात राहतात. गणपतींसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना खासगी बसेस मनमानी भाडे आकारत आहेत. त्यामुळे कोकणवासियांसाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून दिल्यास तसेच कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्यास या कठीण काळात त्यांना थोडा दिलासा मिळेल, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्याद्वारे ही मागणी करत ट्विट सुद्धा केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER