मनसेची मागणी : ‘तो निधी कोरोनाने मृत पावलेल्या गरीब व्यक्तीच्या कुटुंबीयांना द्या’

Bala Nandgaonkar

मुंबई : मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने मोठा हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले. तर काही कुटुंबे कमावता व्यक्ती कोरोनाचा बळी पडल्याने उघड्यावर आली आहेत. काही बालके अनाथही झाली आहेत. अशा गरीब कुटुंबांना आणि अनाथ झालेल्या मुलांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेचे (MNS) ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी ही मागणी केली आहे.

कोरोनाने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली, यातील अनेकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे कोरड्या सहानुभूतीची नव्हे तर भरीव मदतीची आवश्यकता आहे. नियोजित आमदार निवास कधीही बनवता येईल; परंतु तेवढ्याच खर्चात (९०० कोटी) मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये देता येतील व ते देणे उचित ठरेल. अशाने त्यांना खरंच मोठा आधार भेटेल. तसेच कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांची शाळेची फी, बसची फी या वर्षी सर्वच शाळांनी माफ करावी. त्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी सरसकट तसे आदेशच द्यावे, अशी मागणी करत छत्तीसगड येथील खाजगी शाळांनी मनाचा मोठेपणा दाखवत तसा निर्णय घेतला आहे, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button