महापालिकांना तसा सरसकट आदेश द्यावा; मनसेची ठाकरे सरकारकडे मागणी

MNS demands from Thackeray government

मुंबई : राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या कोरोना पीडितांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) सेनेने राज्य सरकार (Thackeray government) आणि महापालिकांकडे (Mahanagarpalika) महत्त्वाची मागणी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

“महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच महापालिका या श्रीमंत आहेत. अनेकांकडे हजारो कोटींच्या ठेवी आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेच्याच कामाला आला पाहिजे. कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या घरच्यांना या वर्षी घरपट्टी माफ करणं गरजेचं आहे. सर्वच स्थानिक संस्थांनी हे त्वरित करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. राज्य सरकारने सरसकट तसा आदेशच द्यायला हवा. सरकारने/महापालिकांनी जनतेप्रती आपली जबाबदारी झटकू नये. ” असं बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button